— “स्वातंत्र्याचा जयघोष” —-
उंच फडकू या तिरंगा नभात,
स्वप्नांना देऊया आज नवा हात,
रक्ताचा प्रत्येक थेंब जिथे सांडला,
त्या मातीचा सुवास आज गगनात दरवळला.
शौर्य, बलिदान, आणि त्यागाचा वारसा,
वीरांच्या कथा हाच आमुचा आरसा,
आकाशात आज गीत उमटू दे,
“वंदे मातरम” चा निनाद घुमू दे.
अंधारात ज्यांनी दीप प्रज्वल केला,
बंधनांतून भारत मोकळा झाला,
त्यांच्या स्वप्नांना देऊया गगन,
आपण घडवूया नवा हिंदुस्तान.
शेतात उगवू दे अन्नाचा सोहळा,
विज्ञान, कला, उद्योग फुलु दे मोकळा,
युवकाना तंत्रज्ञानाचा लागुदे शोध,
त्याजोरावर जगात देऊदे बोध.
बंधुभाव, समानता, एकता हा संदेश घ्यावा,
भारताला पुन्हा जगात प्रथम नेऊ या.
असुधैव कुडुंबकम्म चा नारा देऊ या
भारताला विश्व गुरू बनाउ या.
आजच्या दिवसाचा हा संकल्प घ्या,
एकतेच्या धाग्यांनी देश गुंफा,
तिरंग्याच्या छायेत जीवन जगा,
“जय हिंद” चा नारा हृदयात रुजवा!
===प्राचार्य अंकुश दराडे, अहिल्यानगर

